पिंपळबन

" लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकसहभागातून हाती घेतलेला उपक्रम....!!  "

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्याच्या उत्तरपूर्व सीमेवर वसलेले “कुडाळ” गाव. कुडाळच्या एका बाजूने पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी निरंजना (कुडाळी) नदी आणि या नदीच्या तीरावर वसलेले गावचे आराध्य दैवत श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर देवस्थान. पूर्वी या देवस्थान परिसरात पिंपळ आणि वड या वृक्षांच्या घनदाट अरण्यामुळेच या देवांना श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर हे नाव दिले गेले अशी आख्यायिका आहे. काळाच्या ओघात, पिंपळ आणि वड नाहीसे झाले पण आपल्या आराध्य दैवताचे महात्म्य जपण्याची संकल्पना कुडाळच्या युवकांच्या मनात डोकावली आणि त्यातूनच “पिंपळबन” संकल्पना जन्माला...   सविस्तर वाचा

अभिप्राय